अल्पाक्षरी ….
About Me
Unknown
View my complete profile
Tuesday, 19 April 2016
थकलेले डोळे काय
पहातात आरपार ?
तू ही करशील का रे
काळजावरती प्रहार ?
कविता क्षीरसागर
सूर्योदय आणि सूर्यास्त
दोन्ही चित्रात सारखेच रंग
पण किती भिन्न ....
त्यातील आशयतरंग ....
कविता क्षीरसागर
रंग पांघरून प्रसन्नतेचा
ऊन कोवळे हसे फुलातुन
कळ्या कळ्या अन् मनात म्हणती
मी ही सुंदर दिसेन याहून
कविता क्षीरसागर
तुझ्या प्रतीक्षेत
पावसात
मी चिंब उभी ...
गालावरुन ओघळणारे
पाणी
तू पावसाचे
कसे समजलास ?? !!!!
कविता क्षीरसागर
Friday, 15 April 2016
गावकुसाबाहेर फेकले
रोगी समजून ज्यांना
तूच होऊनी त्यांचा "बाबा"
सांभाळलेस त्यांना
कविता क्षीरसागर
Thursday, 14 April 2016
पाऊस आल्यावर
फक्त मोरच नाचतो असं नाही
फुलतो मनाचा पिसारा आपल्याही ...
कविता क्षीरसागर
टपटपला प्राजक्त
दरवळला सुगंध
मदहोश करी त्यात
तुझी आठवण धुंद
कविता क्षीरसागर
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)