Tuesday, 19 April 2016



थकलेले डोळे काय
पहातात आरपार ?
तू ही करशील का रे 
काळजावरती प्रहार ? 


कविता क्षीरसागर 

सूर्योदय  आणि सूर्यास्त
दोन्ही चित्रात सारखेच रंग

पण किती भिन्न ....
त्यातील आशयतरंग ....

कविता क्षीरसागर




रंग पांघरून प्रसन्नतेचा
ऊन कोवळे हसे फुलातुन
कळ्या कळ्या अन् मनात म्हणती
मी ही सुंदर दिसेन याहून

कविता क्षीरसागर
तुझ्या प्रतीक्षेत
पावसात
मी चिंब उभी ...
गालावरुन ओघळणारे
पाणी
तू पावसाचे
कसे समजलास ?? !!!!

कविता क्षीरसागर



Friday, 15 April 2016





गावकुसाबाहेर फेकले
रोगी समजून ज्यांना
तूच होऊनी त्यांचा  "बाबा"
सांभाळलेस त्यांना

कविता क्षीरसागर

Thursday, 14 April 2016




पाऊस आल्यावर
फक्त मोरच नाचतो असं नाही

फुलतो मनाचा पिसारा आपल्याही ...


कविता क्षीरसागर

 




टपटपला प्राजक्त
दरवळला सुगंध
मदहोश करी त्यात
तुझी आठवण धुंद

कविता क्षीरसागर

   

बाळाच्या चेहे-यावरचे हासू
कुणी नका रे पुसू
उरली आहे तेवढीच
नि:स्वार्थतेची खूण …


कविता क्षीरसागर

                               



किती विश्वासाने
जवळ आलेय फुलपाखरु

नको नं त्याला चिमटीत धरु !!  

कविता क्षीरसागर






शोधतात डोळे
ओलावा आभाळी
लागली उन्हाळी
अंकुरांना ...

कविता क्षीरसागर